
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) 2026 मध्ये होणाऱया इयत्ता दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षांसाठी संभाव्य वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार या परीक्षा 17 फेब्रुवारी ते 15 जुलै 2026 दरम्यान घेतल्या जाणार आहेत.
17 फेब्रुवारी ते 15 जुलै या कालावधीत होणाऱया परीक्षांमध्ये दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षा, बारावीच्या क्रीडा विद्यार्थ्यांसाठी परीक्षा, द्वितीय बोर्ड परीक्षा (दहावी) आणि पुरवणी परीक्षा (बारावी) चा समावेश आहे. या तारखा तात्पुरत्या असून शाळांनी विद्यार्थ्यांची अंतिम यादी सादर केल्यानंतर अंतिम वेळापत्रक प्रसिद्ध केले जाईल, असे सीबीएसईने स्पष्ट केले आहे.
लेखी परीक्षांसोबतच निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी प्रात्यक्षिक, मूल्यांकन आणि निकालोत्तर प्रक्रियादेखील राबवल्या जातील. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, प्रत्येक विषयाच्या परीक्षेनंतर सुमारे 10 दिवसांनी उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू होईल आणि 12 दिवसांत ते पूर्ण होईल.