गुजरातमधील सूरत विमानतळावर दुर्घटना, लँडिंग करताना प्रशिक्षणार्थी विमान धावपट्टीवरून घसरले

गुजरातमधील सूरत विमानतळावर रविवारी विमान दुर्घटना घडली. पायटल प्रशिक्षणादरम्यान लँडिंग करताना एक प्रशिक्षणार्थी मिनी प्लेन धावपट्टीवरून घसरले. सुदैवाने दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र विमानाचे मोठे नुकसान झाले आहे. घनटेचा व्हिडिओ समोर आला आहे. घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे.

सूरत विमानतळावर दुपारच्या सुमारास पायलट ट्रेनिंग सुरू होती. यावेळी लँडिंग करताना संतुलन बिघडल्याने विमान धावपट्टीवरून घसरले. पायलट प्रशिक्षण केंद्राने सुरवातील घटना लपवण्याचा प्रयत्न केला. मात्र स्थानिक प्रशासनाला घटनेची माहिती मिळताच चौकशी सुरू करण्यात आली. या घटनेमुळे विमानतळावरील सुरक्षा आणि प्रशिक्षण व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.