Chhattisgarh Encounter – छत्तीसगडमध्ये चकमकीत तीन नक्षलवादी ठार, घटनास्थळावरून हत्यारे जप्त

छत्तीसगडमधील कांकेरमध्ये सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये रविवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलांनी तीन नक्षलवाद्यांचा खात्मा केला. सुरक्षा दलाने घटनास्थळावरून हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. मारले गेलेले नक्षलवादी स्थानिक माओवादी क्षेत्र समितीचे सदस्य होते.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानक पोलिसांच्या डिस्ट्रिक्ट रिजर्व गार्ड (DRG)ची पथके कांकेरमधील रावास जंगलात नक्षलविरोधी मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी गोळीबार सुरू केला. डीआरजी पथकांनीही या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर देत तीन नक्षलवाद्यांना ठार केले. यावर्षी छत्तीसगडमध्ये नक्षलवादविरोधी मोहिमेत आतापर्यंत 252 नक्षलवादी मारले गेले.