
ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. दिवाळीनिमित्त एसटीच्या तिकिटात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय एसटी महामहामंडळाने घेतला आहे. या निर्णयामुळे प्रवाशांच्या खिशाला आर्थिक भुर्दंड बसणार आहे. वातानुकूलित आणि शिवाई बस सेवा वगळता सर्व बस सेवांसाठी 15 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर दरम्यान हा निर्णय लागू असणार आहे.
14 ऑक्टोबर 2025 च्या मध्यरात्री 12 वाजल्यापासून ही भाडेवाढ लागू करण्यात येईल, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. ज्या प्रवाशांनी आधीच आरक्षण केले असेल त्यांना सुधारीत दराप्रमाणे तिकिट दरातील फरक वाहकाकडे भरावा लागेल. 14 ऑक्टोबर रोजी प्रवास सुरू करणाऱ्या प्रवाशांना जुन्या दरानेच तिकिट आकारण्यात येईल. दिवाळी संपल्यानंतर म्हणजेच 6 नोव्हेंबर 2025 पासून 25 जानेवारी 2025 पासून लागू असलेल्या मूळ दराने तिकिट आकारण्यात येईल, असे एसटी महामंडळाने सांगितले.