असं झालं तर… डेबिट कार्डचा पिन नंबर विसरलात तर…

  • एटीएममधून पैसे काढण्यासाठी सर्व बँका खाते उघडल्यानंतर एक डेबिट कार्ड देतात. या डेबिट कार्डद्वारे बँक ग्राहक एटीएममधून हवे तेव्हा पैसे काढू शकतात.
  • परंतु जर आपल्याकडील डेबिट कार्डचा पिन नंबर लक्षात राहिला नाही तर मोठी पंचाईत होते. अशा वेळी काही टिप्स आहेत. त्या तुम्हाला कामी येतील.
  • सर्वात आधी बँकेच्या एटीएममध्ये डेबिट कार्ड टाका. पिन नंबर लक्षात नाही. त्यामुळे फॉरगॉट पिन किंवा पिन विसरला हा पर्याय निवडा.
  • तुमचा नोंदणीकृत मोबाइल नंबर त्या ठिकाणी टाका. मोबाइलवर एक ओटीपी येईल. तो त्या ठिकाणी टाका. नवीन पिन नंबर त्या ठिकाणी टाका.
  • एटीएम मिळत नसेल तर नेट बँकिंग किंवा मोबाइल अ‍ॅपवरूनही पिन रिसेट करता येऊ शकतो. बँकेत जाऊन तुम्ही यासाठी मदत घेऊ शकता.