
जगभरात सोन्याच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत तरीही सोन्याची मागणी कमी होताना दिसत नाही. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या आकडेवारीनुसार, ऑगस्ट महिन्यात जगभरातील केंद्रीय बँकांनी एकूण 15 टन सोन्याची खरेदी केली आहे. ऑगस्ट महिन्यात सर्वात जास्त सोने कझाकिस्तानच्या नॅशनल बँकेने खरेदी केले आहे. कझाकिस्तानने अवघ्या एका महिन्यात 8 टन सोने खरेदी केले आहे.
हिंदुस्थानने ऑगस्ट महिन्यात सोने खरेदी केले नाही. भारतीय रिझर्व्ह बँकेने 2025 च्या आठ महिन्यांत केवळ तीन वेळा सोने खरेदी केले आहे, तर 2024 मध्ये जवळपास प्रत्येक महिन्यात सोने खरेदी केले आहे. डब्ल्यूजीसीच्या माहितीनुसार, आरबीआयने जानेवारी ते ऑगस्ट 2025 या दरम्यान केवळ 3.8 टन सोने खरेदी केले आहे, तर गेल्या वर्षी हिंदुस्थानने 45.5 टन सोन्याची खरेदी केली होती.