असं झालं तर… भिंतीला ओलसरपणा येत असेल तर…

1 भिंतीला ओलसरपणा आल्याने भिंती लवकर खराब होतात. याला वेगवेगळी कारणे असू शकतात. घराच्या छतातून पाणी झिरपल्याने ओलसरपणा येऊ शकतो.

2 पाण्याच्या पाईपलाईनमधून गळती झाल्याने भिंती ओलावतात. त्यामुळे भिंतीवरील पेंट फुगून तडे जातात. भिंतीला भेगा पडल्यानंतरही ओलसरपणा जाणवतो.

3 तुमच्या घरातील भिंतीमध्ये ओलसरपणा जाणवत असेल तर सर्वात आधी भिंतीतील भेगा आणि तडे सिमेंटने बुजवा. छताचे वॉटरप्रूफ करून घेतल्यास ओलसरपणा राहत नाही.

4 खोलीत एक्झॉस्ट फॅन बसवा किंवा खिडक्या जास्तीत जास्त वेळा उघडय़ा ठेवा, जेणेकरून हवा खेळती राहील आणि भिंतीतील ओलसरपणा दूर होण्यास मदत होईल.

5 भिंतीवर वॉटरप्रूफ पेंट लावा. त्यामुळे भिंती ओलाव्यापासून सुरक्षित राहतील. जर हे सर्व करूनही भिंतीतील ओलसरपणा दूर होत नसेल तर वॉटरप्रूफ तज्ञांची मदत घ्या.