
पश्चिम बंगालमधील दुर्गापूर येथे एमबीबीएस विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार झाला. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. या प्रकरणातील पीडितेने पोलिसांना दिलेल्या जबाबात धक्कादायक अनुभव सांगितला आहे.
“त्यांनी मला पकडून जंगलात नेले. मी घाबरले होते. मला त्यांनी मागून येऊन पकडले. मी ओरडायला लागले. मला त्यांनी माझ्या फोनवरून माझ्या मित्राला फोन करायला सांगितला. पण त्याला फोन लागला नाही. त्यानंतर त्यांनी आम्ही जसे सांगतो तसे कर असं सांगतिलं पण मी आरडा ओरडा करायला लागले तेव्हा त्यांनी मला जर ओरडलीस तर बलात्कार करायला आणखी लोकांना बोलवू अशी धमकी दिली”, असे त्या मुलीने पोलीस जबाबात सांगितले.
ओडिशातील जलेश्वर येथील रहिवासी असलेली 23 वर्षीय एमबीबीएस विद्यार्थिनी शुक्रवारी रात्री 8.30 वाजताच्या सुमारास एका पुरुष वर्गमित्रासह कॉलेज कॅम्पसमधून बाहेर पडली. कॅम्पसच्या गेटजवळ काही पुरूषांनी तिचा पाठलाग करून अश्लील भाष्य करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी तिला जबरदस्तीने हॉस्पिटल कॅम्पसच्या मागे असलेल्या एका निर्जन भागात ओढले. जिथे त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. घटनेची माहिती मिळताच, न्यू टाउनशिप पोलिस स्टेशनचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.