चीनचा धोका पाहता तैवान सज्ज

तैवानने बहुस्तरीय एअर डिफेन्स सिस्टम टी-डोम बनवण्याचा संकल्प केला आहे. तैवानला चीनकडून सर्वाधिक धोका आहे. देशाच्या शत्रूंपासून स्वसंरक्षण करण्यासाठी आम्ही आपली एअर डिफेन्स सिस्टम बनवणार आहोत, असे तैवानचे राष्ट्रपती लाई चिंग-ते म्हणाले. ‘देशाच्या शत्रूंपासून असलेला धोका लक्षात घेता बहुस्तरीय एअर डिफेन्स सिस्टमच्या निर्माणाला गती देणार. तैवानमध्ये हाय लेव्हल डिटेक्शन आणि इफेक्टिव इंटरसेप्शनवाल्या टी-डोम बनवण्याचा वेग वाढवण्यात येईल,’ असे लाई चिंग म्हणाले.