तीन कफ सिरप धोकादायक, जागतिक आरोग्य संघटनेकडून आरोग्य सल्ला जारी

हिंदुस्थानातील अनेक राज्यांमध्ये बंदी घातलेल्या तीन विषारी कफ सिरप ब्रॅण्डबाबत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) आरोग्य सल्ला जारी केला आहे. बंदी घातलेल्या तीन कफ सिरपपैकी एकही आढळले तरी सूचना देण्याचे आवाहन जागतिक आरोग्य संघटनेने अधिकाऱ्यांना केले आहे. ज्यामुळे मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये मुलांचा मृत्यू झाला, त्या संशयित कोल्ड्रिफ कफ सिरपचाही उल्लेख ‘डब्ल्यूएचओ’ने जारी केलेल्या निवेदनामध्ये आहे. श्रीसन फार्मास्युटिकल्सचे कोल्ड्रिफ, रेडनेक्स फार्मास्युटिकल्सचे रेस्पिफ्रेश टीआर आणि शेप फार्माच्या रिलाइफ या तीन कफ सिरपचा आरोग्य संस्थेने उल्लेख केलेल्या औषधांमध्ये समावेश आहे.