
मराठा समाजाच्या 10 टक्के आरक्षणाला आव्हान देणाऱया याचिकांवरील पुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे. न्या. रवींद्र घुगे, न्या. संदीप मारणे व न्या. निजामुद्दीन जमादार यांच्या पूर्ण पीठासमोर या याचिकांवर एकत्रित सुनावणी सुरू आहे. हे आरक्षण घटनाबाह्य असल्याचा दावा वरिष्ठ वकील प्रदीप संचेती यांनी बुधवारी केला. युक्तिवाद पूर्ण करण्यासाठी अजून किती वेळ लागेल, अशी विचारणा न्यायालयाने अॅड. संचेती यांच्याकडे केली. पुढील सुनावणीत युक्तिवाद पूर्ण केला जाईल, असे अॅड. संचेतीने स्पष्ट केले.
गेल्या वर्षी राज्य शासनाने मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण जाहीर केले. या आरक्षणाविरोधात डझनभर याचिका दाखल झाल्या आहेत. या आरक्षणाच्या समर्थनार्थ अनेक अर्ज दाखल झाले आहेत. यावर पूर्ण पीठासमोर एकत्रित सुनावणी सुरू आहे.