Photo – क्षण आनंदाचा… सण नात्यांचा!

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या संकल्पनेतून आयोजित शिवाजी पार्क दीपोत्सव 2025चे उद्घाटन संपूर्ण ठाकरे कुटुंबीयांच्या उपस्थितीत मोठ्या दिमाखात करण्यात आले. उद्घाटन सोहळ्यानंतर उद्धव ठाकरे आणि कुटुंबीय राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी गेले होते. रश्मी ठाकरे, शिवसेना नेते-युवासेना प्रमुख-आमदार आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. राज ठाकरे, आई कुंदाताई ठाकरे, पत्नी शर्मिला ठाकरे, कन्या उर्वशी, अमित ठाकरे आणि त्यांच्या पत्नी मिताली यांनी उद्धव ठाकरे आणि कुटुंबीयांचे स्वागत केले. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे मामा चंदूमामा वैद्य हेसुद्धा उपस्थित होते. दोन्ही कुटुंबीयांनी एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या.