
यूपीआयवरून पेमेंट करणाऱ्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. डिजिटल पेमेंट्स करणाऱ्यांना आणखी चांगली सुविधा मिळावी यासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने यूपीआय हेल्प नावाचे एक नवीन एआय पॉवर्ड असिस्टेंट सादर केले आहे. या नव्या टूल्सची सध्या चाचणी सुरू आहे. हे टूल्स लाँच केल्यानंतर यूपीआय युजर्सला फीचर्स, ट्रान्झॅक्शन प्रक्रिया आणि गाइडलाइन्ससंबंधी तत्काळ उत्तरे मिळतील. यामुळे ट्रान्झॅक्शन चेक करणे, तक्रार दाखल करणे किंवा बँकेला अतिरिक्त माहिती पाठवणे सोपे होईल. ऑटोपे किंवा ईएमआय मेंडेट्सला एका क्लिकमध्ये थांबवणे किंवा रद्द केले जाऊ शकते. एआय असिस्टेंटमुळे युजर्सला आता कॉल किंवा कस्टमर केअरसाठी वाट पाहावी लागणार नाही.



























































