
सरन्यायाधीश भूषण गवई यांनी त्यांचे उत्तराधिकारी बनणाऱ्या न्यायमूर्तींच्या नावाची शिफारस करावी, अशी विनंती करीत केंद्र सरकारने पत्र पाठवले आहे. गवई हे 24 नोव्हेंबरला सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांच्या जागी वरिष्ठतेच्या नियमानुसार न्यायमूर्ती सूर्य कांत हे देशाचे 53 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. गवई चार दिवसांच्या भूतान दौऱ्यावर आहेत. तेथून मायदेशी परतल्यानंतर ते पत्राला उत्तर देतील. सरन्यायाधीशांच्या कार्यालयाने तसे कळवले आहे. सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायमूर्तींची नियुक्ती करण्यासाठी ‘मेमोरँडम ऑफ प्रोसीजर’ आहे. त्यानुसार केंद्राने पत्र पाठवले आहे.




























































