
सौदी अरेबियाचे युवराज, पंतप्रधान आणि रुआ अलहरम अलमक्की कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलअझीझ यांनी मक्का शहरात ‘किंग सलमान गेट’ नामक मेगा प्रोजेक्टची घोषणा केली. हा प्रकल्प अलमस्जिद अलहरमला लागून अंदाजे 12 मिलियन चौरस मीटर क्षेत्रफळात विकसित करण्यात येणार असून मक्का आणि परिसराच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.
किंग सलमान गेटचा विकास रुआ अलहरम अलमक्की कंपनीद्वारे करण्यात येत असून मक्काला रिअल इस्टेट विकासासाठीचे जागतिक मानक म्हणून स्थापित करण्याचे या कंपनीचे उद्दिष्ट आहे. अलमस्जिद अलहरमजवळ असलेला हा प्रोजेक्ट मक्कामधील सुविधा उच्च स्तरावर घेऊन जाईल. या प्रकल्पांतर्गत अंदाजे 19 हजार चौरस मीटर क्षेत्रातील ऐतिहासिक स्थळांचा पुनर्विकास करण्यात येईल तसेच मक्काच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यात येईल.’































































