
कल्याणच्या एका बीयर शॉपीमधील बीयर प्यायल्याने एका तरुणाची प्रकृती खालावल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अजय म्हात्रे असे या तरुणाचे नाव असून पालिका रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, उत्पादन शुल्क विभागाने रियल बीयर शॉपवर छापा टाकून एक्स्पायरी संपलेल्या बीयर बाटल्यांचा साठा जप्त केला.
कल्याण पश्चिमेतील प्रेम ऑटो परिसरातील रिअल बीयर शॉपमधून अजय म्हात्रे यांनी सोमवारी रात्री दोन बीयरच्या बाटल्या खरेदी केल्या होत्या. बीयर प्यायल्यानंतर काही वेळातच त्यांची प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना पालिकेच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.






























































