महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला शस्त्रतस्करी प्रकरणी अटक

महाराष्ट्र केसरी किताब पटकाविलेला आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र्ातस्करी प्रकरणी अटक केली आहे. सीआयए पथकाने पपला गुर्जर टोळीला शस्त्र पुरवठा प्रकरणाच्या रॅकेटचा पर्दाफाश करत चारजणांना अटक केली. यामध्ये सिकंदर शेखचा समावेश असल्याचे समोर येताच कुस्तीविश्वात खळबळ उडाली आहे.

संशयित आरोपींकडून एक लाख 99 हजार रुपये रोख, पाच पिस्तुले, काडतुसे, दोन चार चाकी वाहने जप्त केली आहेत. याप्रकरणी खरड (पंजाब) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसएसपी हरमन हंस म्हणाले, अटक करण्यात आलेले आरोपी हरयाणा आणि राजस्थानात सक्रिय असलेल्या विक्रम उर्फ पपला गुर्जर टोळीशी थेट संबंधित आहेत. आरोपी उत्तर प्रदेशातून शस्त्र्ाs आणून ती पंजाब आणि परिसरात पुरवत असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये तिघेजण गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असून, महाराष्ट्रातील सोलापूर जिह्यातील पैलवान सिकंदर शेखची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांशी संपर्क साधल्याची माहिती हंस यांनी दिली आहे.