
निवडणुकांमुळे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाण्याची शक्यता आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी अनौपचारिक चर्चा करताना ही शक्यता व्यक्त केली.
8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. परंतु त्याच दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका येत आहेत. त्यामुळे अधिवेशन दहा दिवस पुढे जाणार आहे, असे बावनकुळे म्हणाले. सरकारने अद्याप यासंदर्भात अधिकृत घोषणा केलेली नाही. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतरच अधिवेशनाच्या नव्या तारखांचा विचार केला जाईल असे सांगण्यात येते.





























































