
‘शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांना लवकर प्रकृती स्वास्थ्य लाभो’, असे साकडे आज वारक ऱ्यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाला घातले.
पंढरपूरमध्ये कार्तिकीनिमित्त रविवारी राज्याच्या कानाकोप ऱ्यातून शेतकरी, कष्टकरी दाखल झाले. यंदा अतिवृष्टी आणि अवकाळीमुळे शेतकरी संकटात आहे. या संकटाच्या काळात शिवसेना शेतक ऱ्यांच्या मागे उभी राहिली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शेतक ऱ्यांच्या प्रश्नावर सातत्याने आवाज उठवत आहेत. त्यांच्या खांद्याला खांदा लावून शेतक ऱ्यांचे प्रश्न मांडणारे, समस्त वारक ऱ्यांना मुंबईत शिवसेनेच्या माध्यमातून वारकरी भवन मिळवून देणारे संजय राऊत यांची प्रकृती सध्या बरी नाही. संजय राऊत सार्वजनिक जीवनापासून तूर्त दूर आहेत. त्यांची प्रकृती ठणठणीत व्हावी आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी त्यांना आणखी बळ लाभावे, अशी प्रार्थना आज वारकरी विचार मंचाने विठुरायाचरणी केली. मंचाचे अध्यक्ष, श्री वारकरी प्रबोधन महासमितीचे सहसचिव शामसुंदर महाराज सोन्नर, भागवत वारकरी महासंघाचे भारत महाराज घोगरे गुरुजी, ईश्वर वारकरी सेवा संघाचे नरेंद्र महाराज काळे, वारकरी गाथा भजन मंडळाचे बबन महाराज देवकते तसेच विविध वारकरी संघटनांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.



























































