
अफगाणिस्तानमधील मझर-ए-शरीफ शहराला जोरदार भूकंपाचा धक्का बसला आहे. 6.3 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता मोजण्यात आली असून या भूकंपामुळे आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपात 260 जण जखमी झाले आहेत.
भूकंपाचे केंद्र अफगाणिस्तानातील खुल्मच्या 22 किलोमीटर अंतरावर होते. अफगाणिस्तानातील वेळेनुसार रात्री साडे बाराच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपानंतर काही बांधकामे कोसळली असून त्याच्या मलब्याखाली दबून 10 जणांचा मृत्यू झाला. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.
या आधी 31 ऑगस्ट 2025 रोजी पूर्व पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या प्रांताला भूकंपाचा धक्का बसला होता. त्या 2200 हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.



























































