
दिव्यातील आठ बेकायदा इमारतींवर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने ठाणे महानगरपालिकेला दिले आहेत. उच्च न्यायालयाने आदेश देताच पोलीस बंदोबस्तासह पालिकेचे अतिक्रमण पथक आणि पालिका अधिकारी दिव्यात दाखल झाले आहेत. या बेकायदाशीर इमारतींजवळ पालिकेचे अधिकारी 15 जेसीबी, 2 हजार पोलिसांसह तोडक कारवाईसाठी दाखल झाले आहेत. थोड्याच वेळात बेकायदा इमारतीचा रिकामी करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
            
		





































    
    























