
दादर कबुतरखान्यासह सुरू करण्याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा पुन्हा आमरण उपोषण सुरू करेन, असा इशारा देत जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी आज सुरू केलेले उपोषण मागे घेतले. त्यामुळे कबुतरखान्यांबाबत सरकार १५ दिवसांत कोणता निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुंबईतील कबुतरखाने सुरू करा या मागणीसाठी जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांनी आझाद मैदानात सकाळपासून आमरण उपोषण सुरू केले होते. जोपर्यंत सरकार आपल्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत अन्न, पाण्याचा त्याग करण्याचा निर्धार त्यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर मंत्री मंगलप्रभात लोढा आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी जैन मुनी नीलेशचंद्र यांची भेट घेतली. चर्चेनंतर १५ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन सरकारने दिले
अशा आहेत मागण्या
जैन मुनी नीलेशचंद्र पुढे म्हणाले की, विलेपार्ले अंधेरी येथील मंदिर तोडले गेले, जैन बोर्डिंग तोडले गेले.आम्हाला सनातन बोर्ड हवे आहे. मुस्लिम बोर्ड जसं तसेच हवे आहे. गोरक्षक हल्ले थांबले जावेत आणि आमचे ५२ कबुतरखाने खुले करण्यात यावेत, अन्यथा आम्ही पुन्हा आंदोलन सुरू करू. मी पालिकेच्या आणि न्यायालयाच्या दोन तासांच्या निर्णयावर संतुष्ट नाही.
            
		





































    
    






















