
मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला स्वत:चे आक्षेपार्ह फोटो व व्हिडीओ पाठवणाऱ्या एका तरुणाला बंगळुरू पोलिसांनी अटक केली आहे. पीडित अभिनेत्रीने त्या तरुणाला अनेकदा वॉर्निंग देऊनही तो न ऐकल्याने तिने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली.
नवीन के मोन असे त्या तरुणाचे नाव असूीन त्याचे फेसबुकवर नवीन्झ या नावाने अकाऊंट आहे. नवीनने तीन महिन्यांपूर्वी कन्नड मालिकांमध्ये काम करणाऱ्या एका अभिनेत्रीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. मात्र तिने रिक्वेस्ट न स्वीकारल्याने चिडलेल्या नवीनने तिला मेसेंजरवरून अश्लील मेसेज पाठवायला सुरुवात केली. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला ब्लॉक केले. मात्र त्याने वेगवेगळ्या अकाऊंटवरून तिला मेसेज करायला सुरुवात केली. त्यात त्याने त्याचे प्रायव्हेट पार्टचे फोटो व्हिडीओही पाठवले.
1 नोव्हेंबरला सदर अभिनेत्रीने त्या तरुणाला भेटायला बोलावले व तत्काळ या गोष्टी थांबवायला सांगितल्या. मात्र तो ऐकला नाही. त्यामुळे
            
		





































    
    




















