
हिंदुस्थानच्या महिला संघाने दक्षिण आफ्रिकेला मात देत वर्ल्ड कप जिंकला. सध्या जगभरात हरमनप्रीत कौरच्या या संघावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. असे असतानाच ICC ने मात्र हरमनला आयसीसीच्या ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’मध्ये देखील स्थान दिलेले नाही. या संघात हिंदुस्थानच्या तीन क्रिकेटपटू असून त्याचे नेतृत्व उपविजेत्या ठरलेल्या दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोलव्हार्डकडे सोपवण्यात आले आहे.
ICC ने आज ‘टीम ऑफ द टूर्नामेंट’ संघाची घोषणा केली. यात टीम इंडियाच्या जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना आणि दिप्ती शर्मा या हिंदुस्थानी संघातील तिघींचा समावेश आहे. तर संघाचे नेतृत्व लॉरा वोलव्हार्ड करणार आहे. लॉराने विश्वचषकात 71.37 च्या सरासरीने 571 धावा केल्या होत्या. या संघात ऑस्ट्रेलियाच्या अॅनाबेल सदरलँड, अॅश गार्डनर आणि अॅलाना किंग यांना संघात घेण्यात आले आहे. तर सिद्रा नवाज ही एकमेव पाकिस्तानी खेळाडू या संघात आहे.































































