
आज आपल्या देशातील परिस्थिती ब्रिटिश साम्राज्यापेक्षा कमी नाही. आधी ब्रिटिश राजवट होती आणि आता नरेंद्र मोदींचे राजवट आहे, अशी टीका काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली आहे. बिहारमधील वाल्मिकी नगर येथे निवडणूक सभेत संबोधित करताना त्यांनी ही टीका केली आहे.
यावेळी बोलताना प्रियंका गांधी म्हणाल्या आहेत की, “नरेंद्र मोदी नेहमीच जनतेला कमकुवत करण्याचे काम करतात. त्यांनी बिहारमध्ये ६५ लाख मते कमी केली आहेत. नरेंद्र मोदी हे असे करतात जेणेकरून ते मते चोरून पुन्हा पुन्हा आपले सरकार बनवू शकतील.”
मोदींवर टीका करत प्रियांका गांधी पुढे म्हणाल्या की, “नरेंद्र मोदी १०,००० रुपये देत आहेत, ते घ्या. या पैशाने तुमचे काम पूर्ण करा, कारण तुम्हाला ते आता मिळत आहे. निवडणुकीनंतर तुम्हाला ते मिळणार नाही. पण नेहमी लक्षात ठेवा की, भाजपचा गरीब आणि शेतकऱ्यांसाठी काम करण्याचा कोणताही हेतू नाही. नरेंद्र मोदी अब्जाधीशांचे लाखो आणि कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करतात, परंतु ते शेतकऱ्यांचे कर्ज माफ करत नाहीत. म्हणून नरेंद्र मोदींकडून पैसे घ्या आणि तुमच्या कुटुंबाच्या भविष्यासाठी महाआघाडीला मतदान करा.”




























































