हे करून पहा – टाचांना भेगा पडल्या तर…

 टाचांना भेगा पडू नये, यासाठी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. पायाची बोटे, टाच मुलायम असावी असे प्रत्येकाला वाटते. जर तुमच्या टाचांना भेगा पडल्या तर यावर काही घरगुती उपाय आहेत. सर्वात आधी दररोज पाय आणि टाच साबन लावून स्वच्छ धुवावेत. शक्यतो तर सॉक्स घातल्यास टाचांना भेगा पडत नाहीत. झोपण्यापूर्वी नारळाचे तेल टाचांना लावल्यास फायदा होतो.

 टाचांना नारळ तेल लावून हलक्या हाताने मालिश करा. रात्रभर मोजे पायात घाला. व्हॅसलीन आणि लिंबाचा रस एकत्र करून लावल्यास भेगांना ओलावा मिळतो. त्वचेची लवचिकता सुधारते. रात्री झोपण्यापूर्वी पायांना तूप लावा व हाताने मालिश करा. त्वचा ओली असताना पेट्रोलियम जेली किंवा जाड तेल-आधारित क्रीम लावा आणि नंतर मोजे घाला.