मोटरसायकल पळवणारा अटकेत

पोलीस कारवाईत जप्त केलेल्या मोटरसायकलचा अपहार करून पळून गेलेल्या एकाला डी.एन. नगर पोलिसांनी अटक केली. मोहम्मद आसिफ शफी मन्सुरी असे त्याचे नाव आहे. त्याने क्यूआर कोडद्वारे दंडाची रक्कम जमा केली होती. मोहम्मद आसिफ हा वाहतूक विभागात कारवाईदरम्यान जप्त केलेल्या वाहनांची रेकी करून बनावट कागदपत्रे वाहतूक विभागात जमा करायचा. कागदपत्रे जमा करताना तो त्या संबंधित व्यक्तीचा नातेवाईक असल्याचे भासवत असायचा. दंड भरल्यावर तो वाहन घेऊन पसार व्हायचा. त्याच्याविरोधात वर्सोवा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे.