
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी तुळजापूर ड्रग प्रकारणारील आरोपी संतोष परमेश्वर याने भाजपमध्ये प्रवेश केला. भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या उपस्थितीत परमेश्वर याने भाजप मध्ये प्रवेश केला. यावरून शिवसेना नेते, आमदार अंबादास दानवे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.
तुळजापुरात ड्रग प्रकारणारील आरोपीला भाजप प्रवेश मिळतो. लँड माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया असे बरेच दोन नंबरचे धंदे करणारे भाजपमध्ये होते. आता ड्रग प्रकरणात मलिन झालेल्या लोकानांही भाजप ‘जनसेवेची संधी’ देऊन पाहते आहे. हे पाहून स्व. अटलजी यांचा आत्मा काय म्हणत असेल!
ड्रग्ज विकून…
— Ambadas Danve (@iambadasdanve) November 12, 2025
अंबादास दानवे यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ”तुळजापुरात ड्रग प्रकारणातील आरोपीला भाजप प्रवेश मिळतो. लँड माफिया, ट्रान्सपोर्ट माफिया असे बरेच दोन नंबरचे धंदे करणारे भाजपमध्ये होते. आता ड्रग प्रकरणात मलिन झालेल्या लोकानांही भाजप ‘जनसेवेची संधी’ देऊन पाहते आहे. हे पाहून स्व. अटलजी यांचा आत्मा काय म्हणत असेल?”, असा सवाल अंबादास दानवे यांनी केला आहे. तसेच ”ड्रग्ज विकून बिघडवू देश, घशाशी आल्यावर भाजप प्रवेश” असा टोलाही त्यांनी या पोस्टमधून भाजपला लगावला आहे.
प्रति
मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
मंत्रालय, मुंबईविषय : तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीस भारतीय जनता पक्षात दिलेल्या प्रवेशासंबंधी तातडीने कारवाई करणेबाबत..
मा. महोदय,
सप्रेम नमस्कार,तुळजापूर शहरातील काहीजणांना काल भारतीय जनता पार्टीमध्ये…
— Supriya Sule (@supriya_sule) November 12, 2025
सुप्रिया सुळे यांचे फडणवीसांना पत्र
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याच मुद्द्यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे. ”तुळजापूरात भाजपमध्ये ज्यांचा प्रवेश झाला त्यात ड्रग्ज प्रकरणातील आरोपीचा देखील समावेश आहे, असे वाचनात आले आहे. विशेष म्हणजे हे प्रवेश भाजपच्या पक्ष कार्यालयात आणि जबाबदार नेत्यांच्या उपस्थितीत झाले याचे सखेद आश्चर्य वाटले. यासोबतच ड्रग्स तस्करीला राजाश्रय मिळतोय हे पाहून तितकीच चिंता देखील वाटली, असे सुप्रिया सुळे यांनी या पत्रात म्हटले आहे.



























































