
‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसीसाठी 18 नोव्हेंबरची मुदत देण्यात आली. परंतु अजूनही ई-केवायसी करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याने लाखो लाडक्या बहिणींची ई-केवायसी पूर्ण झालेली नाही. त्यातच अंतिम मुदत जवळ आली आहे. त्यामुळे आता काय करायचे अशा संभ्रमात त्या आहेत. ‘मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण’ योजनेत ई-केवायसी करताना पती किंवा वडिलांचे आधार कार्ड तसेच अन्य कागदपत्रे जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे या निकषामुळे योजनेतून अजून लाखो महिला बाद होण्याची शक्यता आहे. ज्यांचे पती किंवा वडील हयात नाहीत.






























































