
सुमारे दोन शतकाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या एशियाटिक सोसायटीची बहुचर्चित निवडणूक येत्या 13 डिसेंबर रोजी घ्यायची असा निर्णय सोमवारी व्यवस्थापन समितीच्या बैठकीत झाला आहे. निवडणुकीत 15 ऑक्टोबरपर्यंतच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे.
यापूर्वी संस्थेची 8 नोव्हेंबर रोजी होणारी निवडणूक स्थगित करण्यात आली होती. मतदार यादीची पडताळणी पूर्ण न झाल्याने मोठय़ा प्रमाणात सदस्यत्व अर्ज प्रलंबित असल्याने आणि मतदार यादीतील त्रुटीमुळे निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र आता 13 डिसेंबर रोजी ही निवडणूक घेण्याचे ठरतंय. अशातच आज 2023मध्ये ‘एशियाटिक’वर निवडून आलेल्या व्यवस्थापन समितीच्या सदस्यांच्या पात्रता प्रकरणी धर्मादाय आयुक्तांसमोर सुनावणी झाली.
– 8 नोव्हेंबर रोजीच्या निवडणुकीसाठी भाजपाचे माजी खासदार विनय सहस्रबुद्धे गट, काँग्रेसचे माजी खासदार – ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर गट आणि विद्यमान कार्यकारिणीतील पदाधिकाऱ्यांचा गट अशी तिरंगी लढत होणार होती. त्यासाठी 45 उमेदवार निवडणूक रिंगणात होते. आता 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत 15 ऑक्टोबरपर्यंतच्या सभासदांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे. एकगठ्ठा मतदार नोंदणी आणि मतदार याद्यांतील घोळ यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता.

























































