
दिल्ली येथे लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटातील आत्मघाती हल्लेखोर डॉ. उमर नबी याचे पुलवामा येथील घर सुरक्षा दलाने उद्ध्वस्त केले. आईडीचा वापर करून लष्कराने उमरच्या घरात स्फोट घडवून आणला. गुरुवारी रात्री लष्कराने ही कारवाई केली.
उमरचा डीएनए जुळला!
दिल्लीत स्फोट झालेली आय-20 कार उमर उन नबी हाच चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्फोटानंतर कारमध्ये मृतदेहाचे तुकडे सापडले होते. मृतदेहाचे हे नमुने उमरच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत. स्फोट झाला त्यावेळी तो एकटाच कारमध्ये होता, हेही तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
बातमी अपडेट होतेय…


























































