
>> नीलिमा प्रधान
मेष – शब्द जपून वापरा
वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र, शुक्र युती. क्षेत्र कोणतेही असो मैत्रीचे धोरण ठेवा. काम करताना करताना कायदा पाळा. शब्द जपून वापरा. व्यवसायात उतावळेपण नको.वरिष्ठांना दुखवू नका. राजकीय, सामाजिक क्षेत्रात आरोप होतील. शुभ दि. 18, 19
वृषभ – तणाव दूर सारा
मिथुन – वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, सूर्य गुरू त्रिकोणयोग. सप्ताहाच्या मध्यावर जवळच्या व्यक्ती समवेत तणाव, गैरसमज पोटाची काळजी घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगती करण्याची संधी मिळेल. आत्मविश्वासात भर पडणारी घटना घडेल. शुभ दि. 16, 17
कर्क – अहंकार दूर ठेवा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. तुमच्या क्षेत्रात काम करताना बुfिद्धचातुर्य वापरा. अहंकार नको. कुणालाही कमी लेखू नका. तुमचे महत्त्व वाढेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात जबाबदारी टाळून चालणार नाही. शुभ दि. 16, 17
सिंह – योजना गतिमान करा
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, सूर्य गुरू त्रिकोणयोग. कोणताही किचकट प्रश्न रेंगाळत ठेऊ नका. गोड बोलण्यावर विश्वास ठेऊ नका. नोकरीत चांगली संधी लाभेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात वर्चस्व वाढेल. योजना गतिमान करा. शुभ दि. 16, 21
कन्या – अहंकार दूर ठेवा
वृश्चिकेत सूर्य, राश्यांतर, चंद्र शुक्र युती. वादविवाद टाळा. वाहनाचा वेग नियंत्रणात ठेवा. कायदा पाळा. अहंकाराने नुकसान होईल. कामात सतर्क रहा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात अपमान होईल. कायद्याला धरून वक्तव्य करा. शुभ दि. 16, 17
तूळ – प्रगतीची संधी लाभेल
वृश्चिकेत सूर्य राश्यांतर, रवि बुध युती. कोणत्याही कठीण प्रश्नावर विचारपूर्वक निर्णय घ्या. तुमच्या क्षेत्रात प्रगतीचे नवे दालन उघडेल. नविन दिग्गज व्यक्तींचे परिचय होतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा लाभेल. शुभ दि. 21, 22
वृश्चिक – खरेदी-विक्रीत लाभ
वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, रवि बुध युती. सप्ताहाच्या सुरूवातीला किरकोळ तणाव, अडचणी येतील. पुढे जाण्याची संधी मिळेल. व्यवसायाला कलाटणी मिळेल. खरेदी-विक्रीत फायदा. राजकीय, सामाजिक क्षेत्रातील कामे होतील. शुभ दि. 21, 22
धनु – गुंतवणूक वाढेल
स्वराशीत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. भावनेच्या आहारी न जाता निर्णय घ्या. जवळच्या व्यक्तींना दुखवू नका. नोकरीत संधी लाभेल. गुंतवणूक वाढेल. खरेदी-विक्री करताना जास्त मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात कामाचे कौतुक होईल. शुभ दि. 21, 22
मकर – कामात अडचणी येतील
वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. ठरविलेल्या कामात अडचणी येतील. गैरसमज वाढेल. प्रवासात काळजी घ्या. मनावर दडपण येईल. नोकरी टिकवा. राजकीय, सामाजिक क्षेत्रात स्पर्धा करणारे वाढतील. कायदा पाळा. शुभ दि. 16, 17
कुंभ – दिलासा देणारा काळ
वृश्चिक राशीत सूर्य राश्यांतर, सूर्य बुध युती. तुमच्या क्षेत्रात प्रगतीची संधी लाभेल. समस्या सोडवण्याचे मार्ग लाभतील. नोकरीधंद्यात fिदलासा देणारा काळ असेल. राजकीय, सामाजिक क्षेत्रात निश्चित निर्णयाचा विचार कराल. शुभ दि. 16, 17
मीन – विचारांना चालना मिळेल
वृश्चिकमध्ये सूर्य राश्यांतर, चंद्र शुक्र युती. विचारांना चालना देणारा कालावधी. कुणालाही कमी लेखू नका. निर्णय चुकणार नाही. नोकरीमध्ये काम वाढेल. धंद्यात कामे येतील. राजकीय, सामाजिक क्षेत्रात तुम्हाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न होईल. शुभ दि.21, 22
महत्त्वाची वस्तू जपा
वृश्चिकमध्ये सूर्य राश्यांतर, सूर्य गुरू त्रिकोणयोग. साडेसातीचे पर्व सुरू आहे. मैत्रीत, नात्यात गैरसमज होतील. महत्त्वाची वस्तू जपा. नोकरीत टिकात्मक चर्चा होईल. धंद्यात मोह नको. राजकीय, सामाजिक क्षेत्रात सावध रहा. स्पर्धा जिंकाल. शुभ दि.21, 22



























































