
बिहारमध्ये भाजप प्रणीत एनडीएला पाशवी बहुमत मिळाले आहे. याबाबत पत्रकारांनी भाजप नेते, आमदार भास्कर जाधव यांना विचारले असता त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”हे भाजपचे यश नसून ईव्हीएमचे यश असल्याचे सांगत भास्कर जाधव यांनी भाजपवर निशाणा साधला.
अख्खा देश जरी भाजपला मिळाला तरी त्यांचा जीव मुंबई महापालिकेतच अडकलाय, भास्कर जाधव यांची टीका pic.twitter.com/JDtKepvVbh
— Saamana Online (@SaamanaOnline) November 15, 2025
”हे यश भाजपचं नाही, ईव्हीएमचं आहे. हे यश दुसऱ्या पक्षातून चोरलेल्या आमदार खासदारांचं आहे. हे यश सरकारी तिजोरीतून जी काही रेवडी वाटली गेली आहे. त्या रेवडी वाटपाचा विजय आहे. त्याच बरोबर सत्तेचा दुरुपयोग करून लोकशाही संपवणं, छोटे पक्ष संपवण्याचा प्रयत्न करणं या अहंकाराचा विजय आहे”, असे भास्कर जाधव म्हणाले.
मुंबई महापालिकेवर आमचीच सत्ता येणार असा दावा भाजपने केला आहे. त्यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, ”अख्खा देश जरी भाजपला मिळाला तरी त्यांचा जीव मुंबई महापालिकेतच अडकलाय”,सा टोला त्यांनी हाणला.
























































