
लाईफ अपडेट सर्टिफिकेटच्या नावाखाली ठगाने निवृत्त रेल्वे अधिकाऱ्याची 26 लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना आहे. तक्रारदार हे सेवानिवृत्त रेल्वे अधिकारी असून गेल्या आठवड्यात ते घरी असताना त्यांना एका नंबरवरून फोन आला. त्याने तो एका सरकारी बँकेच्या लाईफ अपडेट सर्फिफिकेट विभागातून बोलत असल्याचे भासवले. फोनवर बोलणाऱ्याने त्याच्या लाईफ अपडेट सर्फिफिकेटचा बहाणा करून बँक खात्याची माहिती घेतली. ठगाने त्यांना बँकेचा पिन विचारला. तो पिन क्रमांक टाकण्यास सांगितला. हा प्रकार संशयास्पद वाटल्याने त्याने फोन कट करून स्विच ऑफ केला. तासाभरानंतर त्याच्या खात्यातून 26 लाख रुपये काढल्याचा मेसेज मोबाईलवर आला. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली.




























































