नितीश कुमार आज घेणार शपथ

बिहारचे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकदा नितीश कुमार यांचे नाव निश्चित झाले असून ते उद्या शपथ घेणार आहेत. ते दहाव्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील. पाटण्यातील गांधी मैदानावर हा शपथविधी सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. बिहारमध्ये एनडीएत सर्वाधिक जागा भाजपला मिळाल्या. नितीश यांच्या पक्षाला भाजपपेक्षा कमी जागा मिळाल्या. त्यामुळे मुख्यमंत्री बदलाची चर्चा सुरू झाली होती. मात्र ती चर्चा फोल ठरली. एनडीएच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत आज नितीश कुमार यांची सर्वसंमतीने नेतेपदी निवड करण्यात आली.