
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी अयोध्येतील राम मंदिरावर भगवा ध्वज फडकवला आणि मंदिराचे बांधकाम अधिकृतपणे पूर्ण झाल्याची घोषणा केली. हा ‘युगप्रवर्तक’ क्षण असून शतकानुशतके झालेल्या ‘जखमा आणि वेदना’ बऱ्या करणारा आहे, असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, ‘संपूर्ण देश आणि जग राममय झाले असताना अयोध्या आणखी एका ऐतिहासिक टप्प्याची साक्षीदार होत आहे’.

























































