
‘‘कृत्रिम बुद्धिमत्ता तथा ‘एआय’मुळे रोजगार जातील हा लोकांमध्ये पसरलेला गैरसमज आहे. उलट येत्या काही वर्षांमध्ये 17 कोटी नवीन रोजगार निर्माण होतील,’’ असा दावा आयटी व एआयतज्ञ चिन्मय गवाणकर यांनी केला.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या 68व्या विवेकानंद व्याख्यानमालेत ‘एआय भीती की संधी’ या विषयावर ते बोलत होते. ‘एआय’ने प्रत्येक क्षेत्रातील गणिते बदलून टाकली आहेत. अनेक कामे झपाटय़ाने होत आहेत. त्यामुळे भविष्यात रोजगार राहतील की नाही अशी चिंता सर्वांना सतावत आहे. गवाणकर यांनी ही चिंता अनाठायी असल्याचे मत मांडले. ‘येत्या काही वर्षांत एआयशी संबंधित नवे रोजगार निर्माण होतील. मात्र त्यासाठी तंत्रज्ञानाशी मैत्री केली पाहिजे, असे गवाणकर म्हणाले.

























































