
महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यासाठी चैत्यभूमीवर येणाऱया लाखो नागरिकांच्या सोयीसाठी अतिरिक्त लोकल ट्रेन धावणार आहेत. मध्य रेल्वेमार्फत शुक्रवारी आणि शनिवारी मध्यरात्री परळ ते कल्याण आणि कुर्ला ते वाशी/पनवेल मार्गावर 12 विशेष ट्रेन चालवण्यात येणार आहेत. या गाडय़ांना सर्व रेल्वे स्थानकांवर थांबा असणार आहे. मेन लाईनसह हार्बर मार्गावर विशेष गाडय़ा धावतील, असे मध्य रेल्वे प्रशासनाने सोमवारी जाहीर केले.
मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर कुर्ला-परळ विशेष गाडी कुर्ला येथून मध्यरात्री 12.45 वाजता सुटेल आणि परळ येथे 1 वाजून 05 मिनिटांनी पोहोचेल. कल्याण-परळ ही विशेष गाडी कल्याण येथून मध्यरात्री 1 वाजता सुटेल आणि परळ येथे 2 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. ठाणे-परळ ही विशेष गाडी ठाणे येथून मध्यरात्री 2.10 वाजता सुटेल आणि परळ येथे 2.55 वाजता पोहोचेल. त्याचप्रमाणे डाऊन मार्गावरही परळ ते कुर्ला/ठाणे/कल्याणदरम्यान अतिरिक्त ट्रेन धावणार आहेत. परळ-ठाणे विशेष गाडी परळ येथून मध्यरात्री 1.15 वाजता सुटेल आणि ठाणे येथे 1.55 वाजता पोहोचेल. परळ-कल्याण विशेष गाडी परळ येथून 2.30 वाजता सुटेल आणि कल्याण येथे पहाटे 3 वाजून 50 मिनिटांनी पोहोचेल. परळ-कुर्ला विशेष गाडी परळ येथून पहाटे 3.05 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3 वाजून 20 मिनिटांनी पोहोचेल. या अतिरिक्त गाड्यांमुळे मध्य रेल्वे मार्गावरून चैत्यभूमीवर येणाऱया प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
हार्बरवर कुर्ला ते वाशी, पनवेलदरम्यान सेवा
हार्बर मार्गावर वाशी-कुर्ला विशेष गाडी वाशी येथून मध्यरात्री 1.30 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 2.10 वाजता पोहोचेल. पनवेल-कुर्ला विशेष गाडी पनवेल येथून 1.40 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 02.45 वाजता पोहोचेल. वाशी-कुर्ला ही विशेष गाडी वाशी येथून पहाटे 3.10 वाजता सुटेल आणि कुर्ला येथे 3 वाजून 40 मिनिटांनी पोहोचेल. तसेच डाऊन दिशेने कुर्ला-वाशी विशेष गाडी कुर्ला येथून मध्यरात्री 2.30 वाजता सुटेल आणि वाशी येथे 3 वाजता पोहोचेल. कुर्ला-पनवेल विशेष गाडी कुर्ला येथून 3 वाजता सुटेल आणि पनवेल येथे पहाटे 4 वाजता पोहोचेल. कुर्ला-वाशी विशेष गाडी कुर्ला येथून पहाटे 4 वाजता सुटेल आणि वाशी येथे 4 वाजून 35 मिनिटांनी पोहोचेल, असे मध्य रेल्वेने जाहीर केले आहे.































































