ट्रेंड – बायकोचा धाक, सिंह गपगार

सोशल मीडियावर सिंह आणि सिंहिणीच्या भांडणाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये बायकोचा धाक फक्त माणसांनाच नाही तर सिंहालाही असतो हे दिसून आलंय. सिंहाचे पिल्लू आपल्या बापाजवळ बापाच्या कुशीत जाण्यासाठी येतं आणि सिंह आधीच काही कारणामुळे तोंड फुगवून बसलेला दिसतो. जसे पिल्लू त्याच्याजवळ येते तसा तो त्या पिल्लाला आपल्या पंजांनी लांब ढकलून देतो. हे पाहून त्या पिल्लाची आई म्हणजेच सिंहीण चिडते आणि त्या सिंहाच्या एक कानशिलात लगावते. जणू काही ‘लेकराला का मारताय?’ असा जाब विचारते. त्यावर सिंह गप्प राहतो. त्याच्या मनात बायकोची असलेली धास्ती स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडीओ  animals.rebellion नावाच्या इनस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे.