
हिंगोलीत शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी मतदान केंद्रात घुसखोरी करत मतदान प्रक्रियेत हस्तक्षेप केला. याप्रकरणी त्यांच्यावर हिंगोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून निवडणूक आयोगानेही अहवाल मागवला आहे. हिंगोली शहरात मंगळवारी बाजार परिसरातील मतदान बूथवर हा प्रकार घडला.
मालवणात शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून उतरवल्या पैशांच्या बॅगा वैभव नाईक यांचा आरोप
मालवणात शिंदे गटाचे आमदार नीलेश राणे यांनी भाजपचे पैसेवाटप समोर आणल्यानंतर आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा व्हिडीओ समोर आला. शिंदे मालवणात हेलिकॉप्टरने आले तेव्हा दोन बॅगा घेऊन बॉडीगार्ड उतरल्याचे त्यात दिसत आहे. हे पैसे नीलेश यांनी मतदारांना वाटल्याचा आरोप शिवसेनेचे माजी आमदार वैभव नाईक यांनी केला.





























































