मुंबई विभाग क्र. 1, 7, 12 मधील शिवसेना महिला पदाधिकारी जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई विभाग क्र. 1, 7 आणि 12 मधील शिवसेना महिला पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत, अशी माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे कळविण्यात आली आहे.

विभाग क्र. 1 मधील पदाधिकारी

उपविभाग संघटक दर्शना भरणे (शाखा क्र. 2, 6), विधानसभा समन्वयक स्नेहा सावंत (शाखा क्र, 2, 6),  शाखा संघटक शैला गंगावणे (शाखा क्र. 6), शाखा समन्वयक नीता चित्ते (शाखा क्र. 6).

विभाग क्र. 7 मधील पदाधिकारी 

विधानसभाप्रमुख सिद्धी जाधव (विक्रोळी विधानसभा), नंदिनी सावंत (मुलुंड विधानसभा), सुनंदा वाफारे (भांडुप विधानसभा), प्रशासकीय कार्यालयप्रमुख प्रिया हळदणकर (विक्रोळी विधानसभा), नीता मोरे (मुलुंड विधानसभा), जयश्री चौधरी (भांडुप विधानसभा).

विभाग क्र. 12 मधील पदाधिकारी 

शाखा संघटक रिया चेंदवणकर (शाखा क्र. 217), सहसमन्वयक रुपाली बुरमेकर (शाखा क्र. 217).