सायबर गुन्हेगारांची कमाई तिप्पट… 22 हजार कोटींची फसवणूक

सायबर गुह्यांचे प्रमाण वाढत आहे. देशाच्या कानाकोपऱयात सायबर फसवणुकीच्या घटना घडत आहेत. सायबर ठग वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून सर्वसामान्य नागरिकांना लक्ष्य करत आहेत. सरकारी आकडेवारीनुसार, 2021च्या तुलनेत 2022 मध्ये देशातील सायबर गुह्यांमध्ये 127 टक्के वाढ झाली आहे. सायबर गुह्यांतील वाढीचे सत्र सुरू आहे. लोकसभेत मंगळवारी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, सायबर गुन्हेगारांनी 2024 साली 22 हजार 845 कोटी रुपये उडवले आहेत. ही रक्कम 2023 पेक्षा तीनपटीने अधिक आहे.

लोकसभेत जेडीयूचे अजय कुमार मंडल यांच्या प्रश्नाला उत्तर देताना गृहराज्यमंत्री बंडी संजय कुमार यांनी सायबर गुह्यांची आकडेवारी सांगितली. एनसीआरपीच्या पोर्टलवर 2021 साली सायबर गुह्यांच्या 452429 घटना नोंदवल्या गेल्या.