
मदिना (Madinah) येथून हैदराबादला (Hyderabad) येणारे इंडिगोचे (IndiGo) विमानाचे बॉम्बच्या धमकीमुळे गुरुवारी सकाळी ११:३० च्या सुमारास अहमदाबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानातील एका प्रवाशाने आपण बॉम्ब घेऊन जात असल्याचा दावा केला. यानंतर, क्रूने त्वरित अधिकाऱ्यांना सतर्क केले आणि विमानाचा मार्ग वळवण्यात आला. सुमारे १८० प्रवासी असलेले हे विमान सुरक्षितपणे उतरले.
सुरक्षा यंत्रणांनी विमानाची कसून तपासणी केली, परंतु आतापर्यंत कोणतीही संशयास्पद वस्तू आढळलेली नाही. बॉम्बचा दावा करणाऱ्या प्रवाशाला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.



























































