
सीमा शुल्क विभागाने छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या आठ दिवसांत विमानतळावर कारवाई करून ड्रग, सोने आणि चलन जप्त केले आहे.
गेल्या काही दिवसांपासून परदेशातून हायड्रोपॉनिक गांजा तस्करीचे प्रमाण वाढले आहे. गांजा तस्करी होऊ नये म्हणून विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. नुकतेच विमानतळावर आलेल्या 5 प्रवाशांकडून एपूण 16,796 किलो हायड्रोपॉनिक गांजा जप्त केला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत सुमारे 16.796 कोटी रुपये इतकी आहे.
गांजा तस्करी प्रकरणी पाच जणांना अटक करण्यात आली. गांजाव्यतिरिक्त सोने तस्करीच्या तीन केसेस करण्यात आल्या. तीन केसेसमध्ये एपूण 81. 67 लाख रुपये किमतीचे 744. 28 ग्रॅम सोने जप्त केले. या प्रकरणी तिघांना सीमा शुल्क विभागाने अटक केली.
पुनर्विकास प्रकल्पातील गुंतवणुकीवर, वार्षिक 18 टक्के तिमाही व्याज देण्याचे आमिष, 19 गुंतवणूकदारांना 31 कोटींचा चुना, आर्थिक गुन्हे शाखेत गुन्हा दाखल
जोगेश्वरी येथील पुनर्विकास करीत असलेल्या प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वार्षिक 18 टक्के तिमाही व्याज देऊ, असे आमिष दाखवत 19 गुंतवणूकदारांची 31 कोटी 26 लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो पुढील तपासाकरिता आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे.
अंधेरी पूर्वेकडील वर्मा नगरात राहणारे महेश दोशी (71) यांच्या तक्रारीवरून मे. रणबीर रियल इस्टेट अॅण्ड डेव्हलपर्स एलएलपी व तिचे संचालक जयपुमार गुप्ता व सुयश गुप्ता यांच्या विरोधात दोशी तसेच अन्य 18 गुंतवणूकदारांची 31 कोटी 26 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मार्च 2021 ते मे 2023 या कालावधीत जोगेश्वरी येथील पुनर्विकास प्रकल्पात गुंतवणूक केल्यास वार्षिक 18 टक्के तिमाही व्याज देण्याचे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडत दोशी व अन्य 18 जणांनी त्यात गुंतवणूक केली. पैसे मिळाल्यानंतर आरोपींनी गुंतवणूकदारांना टाळण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच आरोपींविरोधात तक्रार देण्यात आली होती. त्यानुसार बुधवारी गुन्हा दाखल करून तो आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला.
शेअर मार्केट गुंतवणुकीच्या नावाखाली 13 कोटींची फसवणूक
शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देतो सांगून जोडप्याने गुंतवणूकदाराची 13 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ते जोडपे पळून गेले आहे. फसवणूक केल्या प्रकरणी खार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
तक्रारदार हे व्यावसायिक असून ते अंधेरी येथे राहतात. दोन वर्षांपूर्वी त्याची ओळख एकाशी झाली होती. ओळखी दरम्यान त्याने एक जण शेअर मार्पेटशी संबंधित असल्याचे समजले. त्याची एक पंपनी असून त्याने तक्रारदार याना शेअर मार्पेटमध्ये गुंतवणूक करण्याचा सल्ला दिला होता. तसेच गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देऊ असे सांगितले. त्या अमिषाला बळी पडून तक्रारदार आणि त्याच्या आईने 60 लाख रुपये गुंतवणूक केली. गुंतवणूक केल्यानंतर दिलेल्या मुदतीत नफ्याची रक्कम दिली नाही. याबाबत विचारणा केल्यानंतर तो त्याना वेगवेगळे कारण सांगून टाळण्याचा प्रयत्न करत होता. या विरोधात तक्रारदार पोलिसांत गेले होते.

























































