Putin’s India Visit – पुतिन मदत करण्यासाठी नाही तर, व्यापारासाठी करण्यासाठी आले होते, अखिलेश यादव यांचं वक्तव्य

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हिंदुस्थान दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत दोन्ही देशांमधील अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि अनेक महत्त्वाच्या करारांची घोषणा केली. दरम्यान, समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी पुतिन यांच्या हिंदुस्थान भेटीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले आहे की, “रशियन राष्ट्राध्यक्ष मदत करण्यासाठी नाही तर, व्यापारासाठी आले आहेत. रशिया आणि चीनमधील संबंध खूप मजबूत आहेत.”

अखिलेश यादव यांनी म्हणाले की, “आज डॉलरच्या किंमती कुठे पोहोचल्या आहेत? टॅरिफ लादण्यात आले आहे. जर रशियाचे राष्ट्राध्यक्ष आले आहे तर, ते व्यापार करण्यासाठी आले आहेत. ते आपली मदत करण्यासाठी आले नाहीत.”

एसआयआरच्या मुद्द्यावर बोलताना अखिलेश यादव म्हटले आहे की, “जेव्हा आधार कार्डमध्ये संपूर्ण कागदपत्रे, संपूर्ण डेटा असतो. बँक खाते, ड्रायव्हिंग लायसन्स, जमीन नोंदणी, वैद्यकीय सुविधा, पासपोर्ट, सर्वकाही आधार कार्डशी जोडलेले असते, तर तुम्ही मतदार यादी आधार कार्डशी का जोडत नाही? ते (निवडणूक आयोग) जनतेला त्रास देऊ इच्छितात.”