Indigo विमान सेवा रद्द; प्रवाशांसह आमदार-खासदारांनाही फटका, संसदीय समितीकडून एअरलाईन्सची चौकशी

गेल्या सहा दिवसांपासून इंडिगोची मोठ्या प्रमाणात विमान उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत, परिवहन, पर्यटन आणि नागरी विमान वाहतूक वरील संसदीय समिती लवकरच सर्व एअरलाईन्स आणि इतर संबंधित पक्षांसोबत बैठक होणार आहे. त्याचबरोबर, विमान वाहतूक क्षेत्राचे नियामक ‘डीजीसीए’ आणि विमान वाहतूक मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनाही समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश दिले जातील.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जेडीयूचे खासदार संजय कुमार झा यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती या संपूर्ण प्रकरणावर संबंधित अधिकाऱ्यांकडून स्पष्टीकरण मागेल. याव्यतिरिक्त, भविष्यात अशा प्रकारच्या अडचणी पुन्हा येऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश दिले जाणार आहेत. इंडिगोची उड्डाणे रद्द झाल्यामुळे अनेक खासदार आणि मंत्र्यांनाही त्रास सहन करावा लागला आहे. या त्रासातून गेलेले अनेक मंत्री-खासदार या समितीचे सदस्यही आहेत.

इंडिगोचा गोंधळ थांबेना; प्रवाशांचा उद्रेक! दोन दिवसांत प्रवाशांचे पैसे परत करा, इंडिगोला तंबी

दरम्यान, इंडिगोच्या समस्येमुळे त्रस्त झालेल्या अनेक प्रवाशांनी आपल्या अडचणी खासदारांना कळवून तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच या विषयावर समिती चर्चा करेल, तसेच एअरलाईन्सने तिकिटांचे दर इतके मोठ्या प्रमाणात का वाढवले, यावरही विचारणा केली जाईल.

कम्युनिस्ट पार्टी (CPM) चे खासदार जॉन ब्रिटास यांनी शनिवारी पंतप्रधान मोदींना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीसाठी संयुक्त संसदीय समितीची स्थापना करण्याची मागणी केली आहे.

स्वस्त तिकीट दर, नो कॅन्सलेशन फी…., Indigo चा गोंधळ पण Air India प्रवाशांना मदतीचा हात