
क्रिकेटची जबरदस्त क्रेझ दाखवणारा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. लग्नाचा मंडप, सजावट, पाहुणे, वाद्यांचा गजर सगळं एकीकडे, पण नवरदेवाचे मन मात्र विराट कोहलीच्या दमदार खेळीकडे अडकलेले दिसतेय. लग्न सुरू असतानाच नवरदेव मोबाईलवर लाईव्ह मॅच पाहताना दिसतो. नवरदेव लग्नाच्या मंडपात लग्नाच्या विधींसाठी बसलाय, पण त्याचे लक्ष विरटाच्या बॅटिंगकडे आहे. हे सगळे पाहून शेजारी बसलेली नवरीही हसू आवरू शकत नाही. हा छोटासा, निरागस आणि मजेदार प्रसंग संपूर्ण मंडपातही हलकेफुलके वातावरण तयार करतो. जबरा फॅन, मॅच बघणे हासुद्धा एक पवित्र विधी आहे अशा प्रतिक्रिया नेटिजन्स देत आहेत.


























































