
महागाई कमी होत असल्याच्या सरकारच्या दाव्यांचा फुगा फुटला. नोव्हेंबर महिन्यात किरकोळ महागाईचा दर वाढून 0.71 टक्क्यांवर गेला. भाजीपाला व खाण्यापिण्याच्या वस्तू महागल्याने हा दर वाढल्याचे खुद्द सरकारच्या आकडेवारीतून समोर आले आहे. ऑक्टोबरमध्ये महागाईचा दर 0.25 टक्के होता. गेल्या 14 वर्षांतील हा निचांकी दर होता. मात्र, तो नोव्हेंबरमध्ये वाढला आहे.
चांदी दोन लाखांवर!
सोन्याचा भाव आज 1,32,710 रुपये झाला, तर चांदीने सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला. चांदी तब्बल 1,09,163 रुपये प्रति किलोने वाढली आहे. गतवर्षी 31 डिसेंबरला चांदी 86,017 रुपये प्रति किलो होती. आज हा भाव 1,95,180 रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे.
























































