
थंडीचा तडाखा वाढल्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या सुमारास धुक्याची चादर अनुभवायला मिळत आहे. मात्र वाहन चालकांना याचा जोरदार फटका बसत आहे. हरयाणामध्ये धुक्यामुळे आज दोन भयंकर अपघात झाले. या अपघातात बस, कार, ट्रक, दुचाकी अशा अनेक गाड्या एकमेकांना धडकल्याने मोठे नुकसान झाले आहे. यामुळे मोठय़ा प्रमाणात वाहतूक काsंडी झाली होती.
हरयाणाऱ्या हिसारमध्ये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वर धिकटाना येथील वळणाजवळ पहिला अपघात झाला. धुक्यामुळे हरयाणा रोडवेजच्या दोन बस अन्य वाहनांना धडकल्या, तर दुसऱ्या घटनेत पैथल रोडवेजची एक बस डंपरला धडकली आणि पुढे जाऊन अनेक गाडय़ांना धडकली. त्यानंतर मागून आलेली एक बस उभ्या गाडय़ांना धडकली. त्यानंतर एक कार आणि एक दुचाकी या गाडय़ांना धडकली.




























































