IND vs SA T20 – टीम इंडियाला मोठा झटका; अक्षर पटेल मालिकेतून बाहेर, ‘हा’ अष्टपैलू खेळाडू 2 वर्षानंतर संघात

हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकेत पाच सामन्यांची टी-20 मालिका सुरू आहे. पहिल्या तीन लढतीत दोन विजय मिळवत हिंदुस्थानने मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली असून मालिकेतील चौथा सामना लखनौ येथे खेळला जाणार आहे. या लढतीपूर्वी हिंदुस्थानला मोठा धक्का बसला आहे. स्टार अष्टपैलू खेळाडू अक्षर पटेल हा आजारपणामुळे मालिकेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी शाहबाज अहमद याची संघात निवड झाली आहे. तब्बल दोन वर्षांनंतर त्याची टीम इंडियात वर्णी लागली आहे.

बीसीसीआयने सोमवारी ट्विट करत अक्षर पटेल उर्वरित मालिकेला मुकणार असल्याची माहिती दिली. अक्षर पटेल आजारपणामुळे उर्वरित दोन लढती खेळू शकणार नाही. त्याच्या जागी अखेरच्या दोन लढतींसाठी शाहबाज अहमद याची संघात निवड करण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयने दिली.

अक्षर पटेल हा धरमशाला येथे झालेल्या तिसऱ्या लढतीतही खेळला नव्हता. हा सामना सुरू होण्यापूर्वीच तो आजारी पडला होता. आता तो 17 डिसेंबरला लखनौ आमि 19 डिसेंबरला अहमदाबाद येथे होणारा सामनाही खेळू शकणार नाही. अर्थात तो हिंदुस्थानच्या संघासोबत लखनौला प्रवास करणार असून तिथे त्याच्यावर पुढील वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत, अशीही माहिती बीसीसीआयने दिली.

दरम्यान, शाहबाज खान हा देखील अष्टपैलू खेळाडू आहे. 2022 मध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच पदार्पणाचा टी-20 सामना खेळला होता. तो हिंदुस्थानसाठी अखेरचा ऑक्टोबर 2023 मध्ये मैदानात उतरला होता. त्यानंतर गेल्या दोन वर्षात त्याला संधी मिळाली नव्हती. मात्र आता अक्षर आजारी पडल्याने त्याची निवड करण्यात आली आहे.

Lionel Messi India Tour – लिओनल मेस्सीला टी-20 वर्ल्ड कपचं तिकीट, जर्सी आणि एक खास बॅट भेट